पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान महत्त्वाचे!

गोपुरी आश्रमात छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन
आपल्या समाजाभिमुख कार्यातून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणारे राजर्षी शाहू महाराज यांचे पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत असणारे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या या कार्याचा वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, असे उपस्थित मान्यवरांनी उद्गार काढत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. शाहू महाराज यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य आदर्शवत असून नेता कसा असावा, याचे उत्तम उदाहरण आहे. समाज जडणघडणीसाठी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक मेस्त्री, सदस्य विनायक सापळे, संदीप सावंत, प्रदीप मांजरेकर, राजेंद्र कदम, राजेंद्र काळसेकर, सतीश अपराध, योगेश सावंत, सखाराम सपकाळ, सदाशिव राणे, कल्पना परब आदी उपस्थित होते.