अंमली पदार्थ्यांचे सेवन म्हणजे भविष्याचा नाश – श्री. लिमये.

कणकवली/मयूर ठाकूर

अंमली पदार्थ सेवन तसेच नशा येणाऱ्या पदार्थांचे सेवन हे भविष्याच्या नाशाचे मूळ कारण आहे. असे उद्धगार रोटरी क्लब कणकवली सेंट्रल चे रोटरीयन श्री. प्रमोद लिमये सर यांनी काढले. जागतिक अंमली पदार्थ प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने श्री.प्रमोद लिमये सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सिगारेट, गुटखा, किंवा मद्यामध्ये निकोटीन नावाचा पदार्थ असतो तो मानवी मेंदूला आणि इतर शरीरातील संस्थांना इजा पोचवतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून भविष्यात दूर राहिलात तर सुखी जीवन आणि आदर्श जीवन जगाल असे मोलाचे मार्गदर्शन सरांनी केले.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे सर यांच्या हस्ते श्री. लिमये सर यांचं स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई तसेच इयत्ता 8 वी आणि इयत्ता 9 वी चे विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर सर यांनी मानले

error: Content is protected !!