कणकवली काँग्रेस कार्यालयात श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन साजरा

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला स्मृतींना उजाळा

कणकवली येथे काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेसचे दिवंगत नेते आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्रीधर नाईक यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले, श्रीधर नाईक यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात समाजासाठी जे भरीव कार्य केले ते कधीही विसरता येणार नाही. राजकारण, समाजकारणामध्ये काम करताना धर्मनिरपेक्ष समाजासाठी, गोरगरिब जनतेच्या अडीअडचणीला धाऊन जाण्यासाठी आणि सत्याच्याबाजूने उभे राहण्याचे जे काम केले आहे आज चौतीस वर्षानंतर सुद्धा विस्मृतीत जात नाही. आपल्या छोट्याशा राजकीय आयुष्यात काँग्रेस पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पक्षवाढीसाठी झोकून देऊन काम केले. मला असे वाटते की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुर्वीचे वैभव मिळवून देणे हीच श्रीधर नाईक यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळी व्ही के सावंत, आबू पटेल, राजेंद्र कदम, संजय सावंत, प्रवीण वरूनकर, प्रदीप जाधव ,तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!