आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये दहावी बारावी गुणवंताचा सत्कार सोहळा संपन्न

कणकवली/मयूर ठाकुर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे इयत्ता दहावी व बारावी गुणवंतांचा सत्कार सोहळा आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.या सत्कार सोहळ्यात इयत्ता बारावीच्या ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखा (नियमित )वाणिज्य शाखा (नियमित) तसेच विज्ञान शाखा (इंटिग्रेटेड) यामधील पहिल्या तीन गुणवंतांना सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले तसेच इयत्ता दहावी मधील 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले
प्रतिवर्षी कै. श्रीधर बडे सर यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी मधील प्रथम तीन येणाऱ्या गुणवंतांना गौरविण्यात येते,यावर्षी या गुणवंतांना गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता दहावी व बारावीला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा प्रवास उघडला तर पालकांमधून श्री अजित सावंत सर यांनी प्रशालेविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सल्लागार डी.पी तानावडे सर,संस्था सदस्य श्री.अनंत बडे सर तसेच बडे मॅडम अरुण वळंजू सर मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई मॅडम, गतवर्षीचा आयडियल ज्युनिअर कॉलेज मध्ये अव्व्ल आलेला शुभम तिवरेकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्राध्यापक श्री. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम, सल्लागार डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री.हेमंत पाटकर व शिक्षिका सौ. शीतल बांदल यांनी केले.