कै.श्रीधरराव नाईक यांचा 34 वा स्मृतिदन 22 जून रोजी

रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थ्यांचा व शेतकऱ्यांचा होणार सन्मान

कै.श्रीधरराव नाईक यांचा ३४ वा स्मृतिदिन रविवार दि. २२ जून रोजी श्रीधर नाईक चौक येथे संपन्न होणार आहे. कै.श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थित हार अर्पण सकाळी ९.३० वा रक्तदान शिबीर, सकाळी १० वा कणकवली तालुक्यातील प्रशाळेतील प्रथम,द्वितीय, तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कणकवली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माजी खासदार विनायक राऊत, अरुणभाई दूधवडकर, मेजर सुधीर सावंत, माजी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, इर्षाद शेख, सतीश सावंत, अमित सावंत, बाळा भिसे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कै. श्रीधरराव नाईक प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

error: Content is protected !!