प्रतिभा उर्फ माई माणगावकर यांचे निधन

बाजारपेठ आंबे आळी येथील रहिवाशी व कणकवली चे माजी सरपंच कै. सुरेश माणगावकर यांच्या पत्नी प्रतिभा सुरेश माणगावकर उर्फ माई (८०)यांचे बुधवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
गेली अनेक वर्ष कणकवली ग्रामपंचायतचे सरपंच असलेले कै. सुरेश माणगावकर यांच्यासोबत प्रतिभा उर्फ माई यांनी शहर विकासा बरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान मोठे आहे. मीत भाषी असलेल्या प्रतिभा माई यांनी कणकवली शहरात अनेक गोरगरिबांना मदतीचाही हात दिला आहे. शहरात त्यांना माई म्हणून ओळखतात. त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक विवाहित मुलगी सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे त्या सामाजिक कार्यकर्ते नितीन व निलेश माणगावकर यांच्या मातोश्री होत. तर प्राथमिक शिक्षिका सौ. श्रद्धा नितीन माणगावकर यांच्या त्या सासू होत.