हिंदळे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत खुल्या गटात मृणाल सावंत प्रथम
लहान गटात दिया लुडबे प्रथम क्रमांक
श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा यांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यात श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ, हिंदळे भंडारवाडा यांच्या वतीने गुढीपाडवा मांडानिमित्त आयोजित खुल्या भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेत खुल्या गटात पिगुळी कुडाळची मृणाल सावंत तर लहान गटात मालवणची दिया लुडबे यांनी प्रथम क्रमांक मिळविला
श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ,हिंदळे भंडारवाडा यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष परेश खोत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या स्पर्धेत खुला गट दुतीय स्वरांगी खानोलकर सावंतवाडी, तृतीय ऋत्विक निकम रत्नागिरी,उत्तेजनार्थ दिक्षा नाईक पिंगुळी, लहान गट दुतीय सेजल शेटये देवगड, तृतीय आरव आईर पिंगुळी, उत्तेजनार्थ मंत्रा कोळबकर यांनी मिळविला
मोठया गटातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांक-६०२३/-रू, द्वितीय क्रमांक -३०२३/-रू, तृतीय क्रमांक- १५२३/-रू अशी रोख पारितोषिके देण्यात आली. तर बालगट प्रथम क्रमांक-५०२३/-रू., द्वितीय क्रमांक-२५२३/-रू, तृतीय क्रमांक -१०२३/-रू देऊन तसेच सर्वाना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण दीपक तारकर, मोहन हिंदळेकर मुंबई यांनी केले. उद्धाटन व बक्षीस वितरणप्रसंगी सरपंच मकरंद शिंदे अध्यक्ष परेश खोत, प्रशांत खोत, कमलाकर मयेकर, मंगेश मयेकर, विजय शेटये, समील हळदणकर, मनोज जाधव, बबन शेटये, अनिकेत हिंदळेकर, किरण हळदणकर, योगेश पाटील, दयानंद तेली, भाई मांजरेकर. दीप्ती खोत तसेच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.