सचिन इनामदार यांना दप्तरदार पुरस्कार
पन्हाळा : येथील संजीवन विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक आणि वरीष्ठ समन्वयक सचिन इनामदार यांनी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या पदवी (बी.जे.)परीक्षेत सर्व केंद्रांतून प्रथम क्रमांक मिळवून कै.जयवंतराव टिळक सुवर्णपदक तसेच कै.इंदूताई टिळक पुरस्कार व सांगली केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल बापूसाहेब दप्तरदार पुरस्कार मिळवला. पुणे येथील दिमाखदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण कुलपती दीपक टिळक, डॉ.मिताली टिळक, डॉ.गीताली टिळक, प्रशांत दामले आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मनोहर पेशवे, डॉ. हेमंत मोरे यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
गेल्या बावीस वर्षांपासून सातत्याने विविध वर्तमानपत्रे व नियतकालिकातून त्यांचे लेखन प्रकाशित झालेले असून आदर्श शिक्षक व शिक्षा भूषण पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळालेले आहेत. त्यांनी हे सुवर्णपदक मिळवल्याबद्दल संजीवनचे संस्थापक चेअरमन पी.आर.भोसले, सहसचिव एन.आर.भोसले,प्राचार्य महेश पाटील व सर्व संजीवन परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.