अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये उभारण्यात आली पुस्तकांची गुढी

अक्षरमित्र बी.के. गोंडाळ यांची संकल्पना

राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अक्षरमित्र बी.के. गोंडाळ यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी,आपल्या अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये पुस्तकांची गुढी उभी केली.
यावेळी या पुस्तकांच्या गुढी समोर दीपप्रज्वलन व गुढीला पुष्पहार अर्पण गावातील वयोवृद्ध विधावामाता निरंजनी मयेकर व चंद्रभागा मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित महिला व विद्यार्थिनींनी या पुस्तकांच्या गुढीचे पूजन केले.यावेळी
उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके भेट देण्यात आली.
आपण राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरू केलेल्या अक्षरमित्र ग्रंथालय चळवळीचा अधिक प्रसार व प्रचार व्हावा.यासाठी पाडव्याच्या दिवशी पुस्तकांची गुढी या वेगळ्या उपक्रमाचे छोटेखानी आपण आयोजन केले होते तसेच विधवा मातांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी.त्याची.सुरुवात अशा छोट्या.कार्यक्रमातून आपल्याकडूनच याच भावनेतून या गुढीचे पूजन आपल्या.गावातील विधवा मातांच्या हस्ते केले .असे बी.के.गोंडाळ यांनी नम्रपूर्वक सांगितले.या उपक्रमाला त्यांची.पत्नी सौ.मालती गोंडाळ हीची उत्तम साथ मिळाली.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!