खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता अतुल शिवणीवार यांची नागपूर येथे प्रशासकिय बदली

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला सत्कार
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या खारेपाटण येथील उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अभियंता श्री अतुल शिवणीवार यांची नुकतीच राष्ट्रीय महामार्ग नागपूर येथे प्रशासकीय बदली झाली असून खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने आज त्यांची खारेपाटण येथील उपविभगिय कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तर त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेछा देण्यात आल्या.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,उपसरपंच श्री महेंद्र गुरव,ग्रा.पं.सदस्य श्री किरण कर्ले,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,माजी ग्रा.पं. सदस्य श्री योगेश पाटणकर,ग्रामस्थ सूर्यकांत गुरव,संदेश चिके,सहायक अभियंता श्री बी जी कुमावत, कार्यालयीन लिपिक सौ मेघा गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील उपअभियंता श्री अतुल शिवणीवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. अतुल शिवणीवार यांनी सुमारे ३ वर्षे ६ महिने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या खारेपाटण येथील उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून काम केले असून आपल्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, शासकीय कर्तव्य पार पाडत असताना येथील नागरिकांनी केलेले सहकार्य माझ्या नेहमी लक्षात राहील तर महाराष्ट्रातील कोकण हा भाग अतिशय सुंदर नैसर्गिक भूभाग असून या भूमीतून मला बरेच काही शिकायला मिळाले शासकीय चाकोटित राहून काम करत असताना सर्व नागरिकांचे समाधान करणे शक्य झाले नाही.तरी प्रामाणिक पणे काम करण्याचा प्रयत्न केला व आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल येथील जनतेचे आभार असे भावपूर्ण उदगार अभियंता श्री अतुल शिवणीवार यांनी यावेळी काढले.
या सदिच्छा समारंभ प्रसंगी खारेपाटण येथील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे अभियंता अतुल शिवनीवार यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.