हास्यसम्राट प्रा अजित कुमार कोष्टी यांनी कणकवलीत भरवली हास्य जत्रा.

मराठी नूतन वर्षाचे स्वागत करीत आज होणार रोटरी आनंद मेळ्याची सांगता.
गुढीपाडव्याचे औचित्य साधत विशेष ऑर्केस्ट्राचे आयोजन
गेले ११ दिवस सुरू असलेल्या रोटरी आनंद मेळ्याचा आज समारोपीय दिवस.
कणकवली/मयुर ठाकूर.
कणकवली : “रोटरी आनंद मेळा २०२३” च्या अकराव्या दिवशी कणकवलीत चांगलाच हास्यकल्लोळ बघायला मिळाला याच कारण होतं हास्य सम्राट प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांचा कार्यक्रम. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कणकवली आयोजित या कार्यक्रमाला अकराव्या दिवशी चांगलाच प्रतिसाद मिळाला.
कणकवली शहरात गेले अकरा दिवस रोटरी आनंद मेळा 2023 हा मेळा सुरू आहे.या आनंद मेळ्यान एका जत्रेच रूप धारण केलं.याचं कारण ठरलं या आनंद मेळ्यातील एंटरटेनमेंट शो.गेले 11 दिवस विविध कार्यक्रमाने कणकवली शहर हे गजबजलेलं बघायला मिळालं.विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल,विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल,प्राणी, पक्षांची प्रदर्शने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वाने रोटरी आनंद मेळा 2023 चांगलाच चर्चेत आला.रोटरी आनंद मेळ्याच्या या अकराव्या दिवशी हास्यसम्राट प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांनी कणकवली जणू हास्याची जत्रा भरवली आणि कार्यक्रमाला रंगत आली.आजचा दिवस हा आनंद मेळ्याचा शेवटचा दिवस असून आज शेवटच्या दिवशी आणि नवीन वर्षाचे स्वागत अर्थातच गुढीपाडव्या दिवशी “ऑर्केस्ट्रा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यां कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.