कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यकर्ता कसा असावा या पुस्तकाच भव्य प्रकाशन संपन्न

वसई विरार शहर महानगर पालिकेचे माजी महापौर आदरणीय रुपेश सुदाम जाधव यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नुकतच कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यकर्ता कसा असावा लेखक अशोक पां.कांबळे, शेर्पेकर यांच्या पुस्तकाचे भव्य प्रकाशन नालासोपारा,आचोळे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित थाटात पार पडले.प्रकाशनाचे वेळी आदरणीय रुपेश जाधव यांनी जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यकर्ता कसा असावा या पुस्तकाचे विनामूल्य मोफत वाटप करून कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवसाची कायमस्वरूपी सर्वांच्या आठवणीत राहणारी अशी पुस्तकरूपी भेट दिली.त्याच बरोबर त्यांनी लेखक अशोक कांबळे,शेर्पेकर यांचे मनस्वी आभार मानले व एक चांगला विषय नवोदित तरुणांना,कार्यकर्त्यांना आणल्याचे सांगितले.या मुळे तळागाळातील कार्यकर्ता स्वावलंबी होईल व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन स्वतः करेल.या पुस्तकाकरिता लेखक अशोक कांबळे,शेर्पेकर यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!