शिवजयंती दिनी सादर केलेल्या नाटकाच्या बक्षीस रक्कमेतून संविता आश्रमातील बांधवांसाठी सहाय्य.

संकल्प शिवप्रतिष्ठान मांडकुली तालुका कुडाळ या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम.

संदिप परब यांनी केले मांडकुली तील युवकांचे तोंडभरून कौतुक.

संविता आश्रम,पणदूर, दिनांक 4 जून:- कुडाळ तालुक्यातील मांडकुली या गावातील युवा कार्यकर्ते असलेल्या हौसी नाट्यप्रेमी युवकांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन गावात संकल्प शिवप्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिवजयंती निमित्ताने अतिशय मेहनत घेऊन मालवणी धूमशान या नाटकाची गावातल्याच युवकांच्या सहभागाने निर्मिती आणि संयोजन केले.

    मांडकुली गावातील तरुण मंडळींच्या या नाट्य उपक्रमाला ग्रामस्थानी भरघोस प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनी नाटकांतील कलाकारांना रोख रकमेची बक्षीसे देऊन त्यांचे कौतुक केले. या तरुण मंडळींनी नाटकाच्या बक्षीसाची रक्कम आपापसात वाटून न घेता किंवा रकमेचे काही न करता या रकमेतून समाजातील निराधार वंचित बांधवांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमाला जीवनाशक वस्तूंचे सहाय्य करून एक चांगला व असा आदर्श पायंडा पाडला.

     या नाट्यसमूहातील लहान थोर मंडळींनी पणदूरच्या संविता आश्रमाला नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन तांदूळ व खाद्यतेल या जीवनावश्यक  वस्तूंसह बांधवांसाठी बिस्किट व लाडू हा खाऊ आश्रमच्या स्वाधीन केले. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी मांडकुलीच्या शिवप्रेमी व नाट्यप्रेमी युवकांचे तोंडभरून कौतुक केले.
 गावातील उपक्रमशील शिक्षक अनिल गोवेकर, मंगेश मराठे, अमोल गोसावी, नाट्य अभिनेते दिग्दर्शक अक्षय कासले, अभिनेते आणि बाजूच्याच केरवडे गावचेच सुपुत्र सचिन गुंड, जेष्ठ नाट्य अभ्यासक श्री. अंकुश कुंभार यांनी नाट्य निर्मिती साठी बहुमुल्य मार्गदर्शन केले. या हौशीनाट्य मंडळामध्ये अक्षय कासले, वेदांत गावडे, सुमन गावडे, विक्रांत गावडे, गोविंद गावडे, गौरेश पिंगुळकर, हरेश व प्रज्ञय नेमळेकर, महेश मोर्ये, सचिन गुंड, मिलिंद मसुरकर, अजय कासले, सुरज शेगले,  कल्पेश साळगावकर, रोहित मोरमकर, मंदार व यश गोसावी , आकाश कासले, दिपक खरूडे, प्रसाद वारंग, रामचंद्र पेडणेकर, ज्ञानेश्वर कासले, वासुदेव परब, श्रीकांत कासले, विनायक सावंत, रमेश वारंग, सोनु मांजरेकर या तरुणांनी नाट्य निर्मिती आणि संयोजनात उत्स्फूर्त कामगिरी केली.
error: Content is protected !!