ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेवासुदेव दळवी यांचे निधन

कळसुली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव उर्फ आबा दळवी (वय १०१ ) यांचे वृद्धापकाळाने कळसुली येथील राहत्या घरी निधन झाले. ओसरगाव सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे कर्मचारी श्रीकृष्ण दळवी यांचे वडील तर प्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ पत्रकार अजय कांडर यांचे ते सासरे होय.
वासुदेव दळवी हे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते त्याचबरोबर जुन्या काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.कळसुली विविध कार्यकारी सोसायटी, कळसुली प्राथमिक शाळा, कळसुली हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज आदी संस्थान मध्ये ते कार्यरत होते. स्पष्ट बोलण्यासाठी ख्याती असलेले वासुदेव दळवी हे वासूआबा या नावाने सर्वत्र परिचित होते. त्यांच्यातील परोपकारी भावनेमुळे त्यांनी समाजाच्या विविध स्तराला आपल्याशी जोडून ठेवले होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून चार मुली, तीन जावई नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर कळसुली स्मशानभूमीत शोकसभा घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली!

error: Content is protected !!