त्रिंबक ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी..!

सामाजिक कार्यकर्त्या जयश्री सावंत व अर्चना त्रिंबककर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांची 300 वी जयंती शनिवार, दिनांक 31 मे 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय त्रिंबक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ज्यामध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या सत्कारमूर्ती जयश्री सावंत या अनेक वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर असून गावात पहिल्यांदा त्यांनी महिला मंडळाची स्थापना केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या सत्कारमूर्ती अर्चना त्रिंबककर यांनी ही सामाजिक क्षेत्रात काम करत महिलांसाठी भरीव कामगिरी केली आहे. या दोन्ही सत्कारमूर्तीचा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, ग्रामपंचायत अधिकारी माधुरी कामतेकर, नेहा वेंगुर्लेकर, सुचिता घाडीगावकर, संतोषी सावंत, सागर चव्हाण, गणेश गोसावी, राजु त्रिंबककर, छाया साटम, मिनाक्षी त्रिंबककर, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.