सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची 31 मे 2025 रोजी महत्त्वपूर्ण विशेष वैठक.

दि.25 मे तसेच 8 जून तारीख ठरत असताना सर्वसार विचार करता “शनिवार दि.31 मे” हीच तारीख निश्चित.

जिल्ह्यातील भजनी कलाकारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

कणकवली/मयूर ठाकूर

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांना कळविण्यात येते की,संपूर्ण जिल्ह्यातील भजनी कलाकारांची विशेष सभा शनिवार दिनांक 31/05/2025 रोजी कणकवली येथील भालचंद्र महाराज मठ येथे सकाळी ठिक दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.ही सभा अतिशय महत्वाची असून विविध विषयांवर चर्चा होणार आहे.स्पर्धेमध्ये सहभागी होणारे तसेच डबल बारी करणारे आणि इतर सर्वच (भजनी बुवा,पखवाज वादक,तबलावादक,कोरस मंडळी,चकवि वादक व इतर सर्व )भजनी कलाकारांनी या सभेस आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
    या बैठकीचे नियोजन करीत असताना सर्वानुमते "25 मे" अशी तारीख ठरविण्यात आली होती.परंतु त्यानंतर जिल्ह्यातील इतरही भजनी कलाकारांची मते विश्वासात घेता या बैठकीचे नियोजन "8 जून 2025" रोजी करण्यात आले.अखेर पुढील पावसाळ्याचे दिवस आणि शेतीची कामे तसेच इतर सण उत्सव यांचा आढावा घेता या बैठकीचे नियोजन "31 मे" रोजी कणकवली येथील "भालचंद्र महाराज मठ" येथे करण्यात येत आहे.तरी सर्व भजनी कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सभेपुढील विषय :-

✅जिल्ह्यातील भजनी कलाकारांनी एकसंघ राहण्या संदर्भात चर्चा.
✅जिल्हा स्थरावरील नूतन संस्थेचे निर्मितीकरण आणि पदाधिकारी निवड.
✅भजनी कलाकारांच्या असंख्य समस्यांवर चर्चा.
✅कलाकार मानधन संदर्भात चर्चा.
✅होऊ घातलेल्या नूतन जिल्हा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे नियोजन आणि सभासद वाढीसाठी विविध अभिनव उपक्रमांवर चर्चा.

error: Content is protected !!