टेबल टेनिस खेळाडू अंशिता ताम्हणकर हिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते (तालुका कणकवली) येथील असलेली अंशिता अशोक ताम्हणकर हिची मुंबई येथे विशेष कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंशिता अशोक ताम्हणकर ही मुंबई मधील बेस्ट टेबल टेनिस खेळाडू असून मुंबईचे कर्णधार पद भूषविले आहे. मुंबई येथे नुकताच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 35 वा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या विशेष कार्यक्रमात अंशीता हिच्या टेबल टेनिस खेळातील विशेष कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यापूर्वी तिने कमी वयात अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या असून आपल्या लक्षवेधी खेळाने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सध्या ती परेश मुरेकर यांच्याकडे खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. आणि यापूर्वी अनेक स्पर्धा तिने आपल्या उत्कृष्ट खेळाने गाजवल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये तिने भरघोस पदकांची कमाई केली आहे.