100 दिवसाच्या कार्यालयीन उपक्रमांतर्गत कणकवली तालुका अव्वल स्थानी

कणकवली तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप विभागीय अधिकारी कार्यालयांचा डंका
कणकवली तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या तत्परतेची राज्य शासनाकडून दखल
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा निकाल जाहीर झाला असून, कोकण विभागामध्ये कणकवली पंचायत समिती चे गटविकास अधिकारी कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी व सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त तालुका लघु पशु चिकित्सालय या कार्यालयांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. यांना तृतीय क्रमांक देण्यात आला असून, पशुधन विकास अधिकारी कणकवली यांनी कोकण विभागामध्ये प्रथम कणकवली तहसीलदार कार्यालय यांनी द्वितीय बाल संरक्षण अधिकारी यांनी देखील तृतीय क्रमांक मिळवला आहे. शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा मधून कणकवली तालुक्यामधून या कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. जेणेकरून नागरिकांना सुविधा देणे कार्यालयीन स्वच्छता, रेकॉर्ड नीटनेटके ठेवणे या सहित अन्य महत्त्वाची कामे या उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आली होती.