आयडियल इंग्लिश स्कूल चे शिक्षक श्री.हेमंत पाटकर वक्तृत्व स्पर्धेत ठरले राज्यात अव्वल

.कणकवली/मयूर ठाकूर. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दै. बित्तम बातमी ठाणे या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज वरवडे या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. हेमंत मोतीराम पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहें. राज्यभरातून या स्पर्धेत एकूण सुमारे 40 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये पाटकर सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सक्षमीकरण या विषयावर आपले प्रभावी विचार मांडत अव्वल स्थान पटकावले आहें.त्यांना रोख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहें. या पूर्वी सरांनी अनेक वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन स्पर्धा मध्ये जिल्हा, राज्य स्तरावर अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. या यशाबद्दल त्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा, हरिभाऊ भिसे, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर , खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम, सल्लागार डी. पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

error: Content is protected !!