भिरवंडे हनुमंत वाडी नं 1 येथे स्वखर्चातून केला रस्ता

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचे दातृत्व
ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
भिरवंडे हनुमंत वाडी नं 1 येथे हनुमंत जयंती निमित्त माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी भेट दिली त्यावेळी हनुमंत वाडी ग्रामस्थांनी आपल्या रस्त्याच्या समसाय बाबत लक्ष वेधले. विषय त्यांना सांगितला संदेश सावंत तुमचा रस्ता करून मी देणारच असे अभिवचन देऊन दुसऱ्याच दिवशी स्वखर्चाने जेसीबी पाठवुन रस्ता तयार केला. तसेच लवकरच या रस्त्याला निधी मिळवून देणार असून खडीकरण व डांबरीकरण करणार असल्याचे सांगितले संदेश सावंत यांच्या दातृत्वा बद्धल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्ता कामाचा शुभारंभ वेळी भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, भिरवंडे विकास सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत सतीश सावंत बुवा, निशांत सावंत, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.