कणकवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती

पटवर्धन चौकात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास दिली भेट

बाबासाहेबांच्या घटनेने सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा दिली- वैभव नाईक

    भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त आज कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शहरातील बौद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
          यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,राजू राठोड, महेश कोदे, उत्तम लोके, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, सी. आर चव्हाण, रवी राणे, मिलिंद आईर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

     दरम्यान कणकवली पटवर्धन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कणकवलीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या  भारतीय संविधान अमृत महोत्सव सप्ताह सोहळा कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, सुशांत नाईक, नीलम पालव, कन्हैया पारकर, यांनी भेट दिली.  यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उत्सव समितीचे संदीप कदम, सुदीप कांबळे व अन्य  पदाधिकारी उपस्थित होते. 
     याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले, सामान्यातील सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा बाबासाहेबांनी केलेल्या घटनेने दिली आहे.त्यांचे स्वप्न आज साकार झाले आहे. समता बंधुता आणि समानता मूल्यांची स्थापना त्यांनी केली. बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण  दिली त्या शिकवणीनुसार आपण सर्वांनी कार्यरत राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
error: Content is protected !!