विद्यामंदिर प्रशाला कणकवलीच्या कु.आरोही मेस्त्रीला सुवर्णपदक!

आरोही वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परिक्षा 2024/25 मध्ये कुमारी आरोही मनोज मेस्त्री हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मुंबई येथे पार पडला .
होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता सहावी व नववी करिता वर्षभरात एकूण चार टप्प्यात घेतली जाते. यामध्ये लेखी (written exam), प्रात्यक्षिक (practical ), मुलाखत (viva), कृतीप्रकल्प (project) याद्वारे मुलांची पारख केली जाते. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक शिक्षण पद्धतीपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक आहे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक ज्ञान आणि समस्या सोडवण्याची क्षमता याचे परिक्षण केले जाते. भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,
जीवशास्त्र यातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास , प्रात्यक्षिकांसह वैज्ञानिक प्रयोग,मौखिक परीक्षेद्वारे त्यांची आकलन क्षमता ही तपासली जाते. कृतिप्रकल्पाद्वारे ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर तपासला जातो.
यावर्षी जवळ जवळ 88 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते, पैकीजवळ जवळ 6000 विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले. इयत्ता सहावीतून लेखी परीक्षेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीतील कु. आरोही मनोज मेस्त्री ही कोल्हापूर विभागात मराठी माध्यमातून प्रथम आली. या विभागात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी इ.जिल्हयांचा समावेश होतो.
प्रात्यक्षिक परीक्षा कोल्हापूर येथे घेण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षेतून (practical exam ) 6000 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 600 विद्यार्थी पुढील मुलाखत व कृतीप्रकल्पसाठी पात्र झाले. आरोही practical मध्ये कोल्हापूर विभागात द्वितीय आली.
यानंतर मुलाखत व कृती प्रकल्प या परिक्षा मुंबई येथे घेण्यात आली.
आरोहीला या परीक्षेसाठी युरेका सायन्स क्लबच्या सौ. सुषमा केणी मॅडम, वाळके मॅडम तसेच विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी जे कांबळे सर , विज्ञान शिक्षक बर्डे सर, केळुस्कर मॅडम , तेली मॅडम, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी टेक्निशियन तवटे सर. डाॅ.विद्याधर तायशेटे सर,आयडियल हायस्कूल च्या देसाई मॅडम,बांदल मॅडम, डाॅ अर्चना लोहार यांनी मार्गदर्शन केले. कृतिप्रकल्पात केलेल्या ‘शहरात देवराई’ या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणारे श्री. चेतन प्रभू सर,डॉ बाळकृष्ण गावडे सर , डॉ संदीप गुरव, श्री संदीप राणे सर,गोपुरी आश्रम वागदे. प्राध्यापक मुंबरकर सर. मल्हार इंदुरकर , श्री व्हि. के. सावंत,विनायक सापळे, विनायक मेस्त्री , श्री संदिप सावंत, अॅडव्होकेट नारायण देसाई, रुपेश खाडये , दिगंबर जाधव इ. सर्वाचे सहकार्य लाभले.