पूजा सातवसे ठरल्या पैठणीच्या मानकरी

कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा
माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण
कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी संपन्न झाला. यानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनस्टर स्पर्धेत पूजा सातवसे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर संचिता सचिन राणे यांनी द्वितीय तर समृद्धी पेटकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
होम मिनिस्टर स्पर्धेत केसात स्ट्राॅ माळणे, बादलीत चेंडू टाकणे, मेणबत्ती पेटवणे हे खेळ घेण्यात आले. हे खेळ ऋषिकेश मोजरकर यांनी केले. स्पर्धेदरम्यान ऋषिकेश मोजरकर यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत निवेदन करून स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत ९ महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पार पडल्यानंतर पैठणीच्या मानकरी ठरलेल्या पूजा सातवसे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते मानाची पैठणी देण्यात आली. तर द्वितीय क्रमांक प्राप्त संचिता राणे यांना कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते आणि तृतीय क्रमांक प्राप्त समृद्धी पेटकर यांना तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, भास्कर रासम यांनी बक्षीसे दिली. त्यानंतर अजयकुमार सर्वगोड यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सुधीर राणे, तुषार सावंत, मिलिंद पारकर, संजोग सावंत, संजय पेटकर, हेमंत वारंग, उमेश बुचडे, तुषार हजारे, अस्मिता गिडाळे, शशिकांत सातवसे, पंढरीनाथ गुरव, दर्शन सावंत, चित्तरंजन जाधव, राजन चव्हाण आदी उपस्थित होते. मोक्षदा मिलिंद पारकर हिने अप्रतिम गाणे सादर केले, तिलाही बक्षिस देण्यात आले. तसेच अजयकुमार सर्वगोड, दादा कुडतरकर, महेश काणेकर, संतोष राऊळ, राजन चव्हाण,चित्तरंजन जाधव यांनीही मराठी, हिंदी गाणी सादर केली.