खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र

लोकनेते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सकाळी आचरा रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र करत त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी रामेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य चंदू कदम,महेंद्र घाडी, पंकज आचरेकर,अभय भोसले आदी उपस्थित होते.