खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर व सरपंच अशोक पाटील यांच्या मार्फत खाऊ वाटप

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिम्मित भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख खारेपाटण ग्रामीण विभाग चे सूर्यकांत भालेकर, व चिंचवली सरपंच अशोक पाटील यांच्या मार्फत दि.१० एप्रिल २०२५ रोजी चिंचवली येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच- अशोक पाटील,राजू पेडणेकर -उपसरपंच,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- साक्षी भालेकर,उपाध्यक्ष दर्शना गुरव, बूथ अध्यक्ष -रवींद्र गुरव,महेश बांदिवडेकर तंटामुक्ती अध्यक्ष,मुख्याध्यापक- गायकवाड,पदवीधर गटकळ मॅडम उपशिक्षक पूर्वा मॅडम,सुरेखा भालेकर उपस्थित होते.आज शाळेला महावीर जयंती निमित्ताने सुट्टी असून सुद्धा सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित होते.सरपंच अशोक पाटील शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर समितीचे अध्यक्ष साक्षी भालेकर यांनी खासदार नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!