किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे ३ व ५ दिवसीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रममराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताप्रयोजक : सारथी संस्था

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रायोजित मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, आणि कुणबी प्रवर्गातील व्यक्तींसाठी ३ व ५ दिवसीय अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान निवासी प्रशिक्षण तसेच मूल्यवृद्धी, ब्रँडीग व मार्केटिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण विनामूल्य आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच युवक, युवती यांच्यासाठी अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान निवासी प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित केले आहे. यामध्ये परसबागेतील कुक्कुटपालन, फळ प्रक्रिया तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रेः
मराठा प्रवर्गाकरिता शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे मागील वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, हमीपत्र, आधारकार्ड, दोन पासपोर्ट रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत हमी पत्र, अधिवास दाखला, बँक खाते तपशील इत्यादी कागदपत्र आवश्यक असतील. तरी इच्छुकांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdhBM3etQFvDFlxWMr4on3J9dnpxp2nYMhGjJwZrc6AMoL_SA/viewform या संकेतस्थळावर ३० जून, २०२५ पर्यंत सादर करावे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर कागदपत्रे हार्ड कॉपी १५ दिवसांच्या आत सारथी संस्थेस पाठविण्यात यावी.
लाभार्थी निवड अटी व शर्ती :
प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. लाभार्थी फक्त मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे वय १८ ते ४५ दरम्यान असावे. यासाठी लाभार्थ्यांचे मागील वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे. प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान दहावी पास असावा. सारथी पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा.अधिक महितीसाठी किर्लोस कृषि विज्ञान केंद्र येथे संपर्क साधावा.
संपर्क क्र. 9309951234, 9422373056
बाळकृष्ण गावडे
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषि विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग