न्यू इंग्लिश स्कूल आचरे च्या कावेरी परब हिचे एनएमएमएस परीक्षेत यश

न्यू इंग्लिश स्कूल आचरे ची विद्यार्थीनी
कुमारी कावेरी लक्ष्मण परब हि राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेतली जाणारी (NMMS ) परीक्षा उत्तीर्ण होऊन ती सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेली आहे.त्याचबरोबर कुमारी दिविजा संदीप सातपुते नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे .ती सांगेली येथील नवोदय विद्यालयात इ.9 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरली आहे.या दोन्ही विद्यार्थिनींचे उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडै यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक,विद्यार्थी आदी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोशिएशन तसेच स्थानिक स्कूल कमेटी तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!