गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर मनोरूग्णावस्थेत सापडलेल्या दशरथ गोंधळी ह्या बांधवांचे जीवन आनंद संस्थेकडून कुटुंब पुनर्मिलन.

मानसिक स्थिती बिघडल्याने भरकटलेल्या बांधवांची दोन वर्षांनी झाली पत्नीसोबत भेट.

जीवन आनंद संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बांधवाला केले कुटुंबियांच्या स्वाधीन.

म्हापसा,दिनांक,25 मार्च:….तरूण मुलाच्या निधनाने मानसिक स्थिती बिघडल्याने दशरथ गोंधळी हे सावंतवाडीच्या एका गावातील बांधव त्यांच्या घर व कुटुंबापासून दोन वर्षांपूर्वी भरकटले होते. गोव्यातील म्हापसा पर्रा रस्त्यावर निराधार व मनोरूग्णावस्थेत नुकतेच ते जीवन आनंद संस्थेचे संदिप परब आणि कार्यकर्त्यांना आढळून आले. संदिप परब आणि त्यांच्या सहकारीन्नी दशरथ गोंधळी या बांधवांचे कुटुंबियांचा शोध घेवून पोलीसांच्या मदतीने नुकतेच त्यांचे यशस्वी कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले.
म्हापसा पोलिसांच्या मदतीने बांधवाला ताब्यात घेवून प्रथम बांधवाने सांगितलेल्या सावंतवाडी – सालयीवाडा येथील पत्यावर त्यास नेण्यात आले. संविता आश्रमचे हितचिंतक अँडव्होकेट संदिप चांदेकर यांनी बांधवाचा पत्ता शोधण्यासाठी मदत केली. अखेर सावंतवाडी – आरोंदा येथे बांधवास त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन केले.

   बांधव दशरथव गोंधळी यांचा "तरुण मुलगा अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती बिघडली आणि ते घर आणि कुटुंबियांपासून भरकटले होते." यावेळी समजले. उदरनिर्वाहासाठी घरकाम करणा-या दशरथ गोंधळी यांच्या पत्नीने दोन वर्षांपूर्वी हरवलेल्या पतीला आनंदाने स्विकारले.

  निराधार बांधवांचे कुटुंब पुनर्मिलना साठी मदत करणारे प्रसाद आंगणे, प्रवीण शिंगडा , ड्रायव्हर सुनील शिंदे यांचेसह वकील चांदेकर सर व  म्हापसा पोलिस या सर्वांचे संदिप परब यांनी आभार मानले.

 जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांच्या पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी संस्थेच्या गोवा राज्यातील संवेदना आश्रम (पर्रा) आणि  मा आसरोघर (फोंडा) या आश्रमानसह महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग मधील संविता  आश्रम (पणदूर ता.कुडाळ) सह मुंबई आणि पालघर मधील आश्रमानद्वारे कार्यरत आहे
error: Content is protected !!