नाटळ येथील संतोष सावंत यांचे निधन

कणकवली तालुक्यातील नाटळ गुरवाडी येथील संतोष यशवंत सावंत ( ५५ ) यांचे अल्पशा आजाराने कणकवली येथील खाजगी रुग्णायात उपचार सुरु असताना शनिवार दि. २२ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ, काका, काकी, पुतने असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी नाटळ येथील वैकुंटधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी महामंडळाचे माजी कर्मचारी वाय. डी. सावंत यांचे ते पुतणे होत.