कणकवली शहरातील नाथ पै नगर जवळील भागात स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसवा

कमी दाबामुळे अनेक उपकरणे जळून नागरिकांचे नुकसान
अन्यथा आंदोलन छेडण्याचा रहिवाशांचा इशारा
शहरातील नाथ पै नगर महाडेश्वर हॉस्पिटलच्या खालील घराला पुरवण्यात आलेला विजेचा दाब वारंवार कमी जास्त होत असल्याने विद्युत ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. काही वेळा तर या जास्त दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे शॉर्टसर्किट घडल्याच्या घटनाही ताज्या आहेत. त्यामुळे या भागात स्वतंत्र ट्रांसफार्मर बसवावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे
महाडेश्वर हॉस्पिटल च्या नागपूर नगर परिसरात सुमारे पंधरा-वीस घरे असून या सर्व घरांना विद्युत पुरवठा आहे. मात्र या भागात कोणाला विद्युत पुरवठा हा वारंवार कमी जास्त होत असल्याने या भागातील अनेकांच्या घरातली फॅन. टीव्ही, mixer, एसी आदी उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. याबाबतच्या महावितरण कार्यालयात तक्रारी करूनही याची दखल कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. येत्या पंधरा दिवसात या भागातील विद्युत पुरवठा सुरू न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. व ज्या ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झाले आहेत त्यांना भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे