ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांचा रामेश्वर देवस्थान तर्फे सत्कार

इनामदार श्री देव रामेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर भेट सोहळा अवर्णनीय करण्यासाठी योगदान देणारे आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर ऊर्फ चावल मुजावर यांचा इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरे देवस्थान समिती तर्फे संजय मिराशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत ,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, देवस्थान सचिव संतोष मिराशी, दिपक पाटकर, संतोष कोदे,अभय भोसले, मंगेश मेस्त्री, जयप्रकाश परुळेकर, अजित घाडी, उदय घाडी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.