रामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या. विशाखा भाटकर

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे आयोजित होममिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या त्यांना सौ
नेहा नलावडे पुरस्कृत पैठणी देवून गौरविण्यात आले. तर उपविजेत्या सौ मधुरा परब यांना ढेकणे कुटुंबिय पुरस्कृत सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले.
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या रामेश्वर वाचन मंदिराने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या महिला सभासदांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेत 32 स्पर्धकांना सहभाग देण्यात आला होता. विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सौ उर्मिला सांबारी, श्रीमती वैशाली सांबारी, भिकाजी कदम,सौ दिपाली कावले पुरस्कर्ते नेहा नलावडे, कामिनी ढेकणे,वर्षा सांबारी, भावना मुणगेकर सौ श्रद्धा महाजणी, विलास आचरेकर यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थित बक्षिस वितरण करण्यात आले
. या स्पर्धेचे इतर प्रायोजक होते सौ. उर्मिला सांबारी, सौ अंजली बापर्डेकर,सीमा घुटुकडे, प्रणया टेमकर, सई राणे, सुमित्रा गुरव, वैशाली सांबारी, अस्मिता गवस, रक्षिता शानभाग, गीता खेडेकर,नेहा घाडी, स्वाती पेडणेकर, शोभा सुखटणकर, गीता नायर, मानसी राणे, अंजली राणे, स्मिता परब, वैशाली देसाई. या प्रयोजकांद्वावारे प्रत्येक फेरीत स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली. उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा घेऊन आकर्षक बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक सांस्कृतिक समिती सदस्या सौ. वर्षा सांबारी यांनी तर आभार सौ. भावना मुणगेकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे कर्मचारी श्री. महेश बापर्डेकर, सौ. समृद्धी मेस्त्री -बापर्डेकर, स्वप्निल चव्हाण आणि ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले.

error: Content is protected !!