पी.एम. किसान एपीके लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करु नये

अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे झाले आहे उघड

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रशानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan List. APK किंवा Pm Kisan APK मेसेजची लिंक उघडतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
म्हणून शेतकऱ्यानी मोबाईल वर पी.एम.किसान लिस्ट एपीके किंवा पी.एम.किसान एपीके या मेसेजची लिंक उघडू नये किंवा या लिंक चा वापर शेतकऱ्यांनी करु नये. अशी घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!