नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश

देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखेर मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये रोहन खेडेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाचे बळ वाढले आहे. भाजपाचे सभागृहातील नगरसेवक आता १२ झाले आहेत.

यावेळी भाजपाचे नेते बाळ खडपे, नगरसेवक बुवा तारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!