अखेर “त्या” ओमनी कार मालकाचा शोध घेत दंडात्मक कारवाई

कणकवली वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, दिगंबर घाडीगावकर यांच्याकडून कारवाई
गेले सहा दिवस एकाच जागेवर रस्त्यावर पार्किंग करून ठेवण्यात आली होती कार
कणकवली शहरात भालचंद्र महाराज रस्त्यालगत गेले सहा दिवस ओमनी कार बेवारस रित्या पार्किंग करून ठेवल्या प्रकरणी आज “कोकण नाऊ” च्या माध्यमातून वृत्तप्रासारित होतात कणकवली पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत सदर कार मालकाचा शोध घेतला व वाहतुकीस अडथळा केल्या प्रकरणी संबंधित कार मालकावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण तालुक्यातील शिरवडे येथील महेंद्र गावकर असे या ओमनी कार मालकाचे नाव असून याप्रकरणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पोलिसांचे तीन दिवसांपूर्वी लक्ष वेधले होते. मात्र कारवाई होत नसल्याने अखेर आज कोकण नाऊ च्या माध्यमातून या प्रश्नी लक्ष वेधण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गाडी मालकाचा शोध घेत ही ओमनी कार ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्याची तयारी केली असता याच दरम्यान गाडी मालक महेंद्र गावकर यांनी या ठिकाणी येत सदर गाडी आपली असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. व हा दंड वसूल देखील केला.