भारतीय प्रतिमा शिक्षक पुरस्काराने योगेश चव्हाण सन्मानित

गोवा पणजी येथे पार पडलेल्या ९ व्या जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न
९ वा जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभ २०२५ गोवा पणजी येथे संपन्न झाला. यावेळी प्रतिमा आंतरराष्ट्रीय संशोधन संघटना गोवा, राष्ट्रीय प्रधान मुख्य सरपंच संघ,नवी दिल्ली आणि बाबू जगीवन राम कला संस्कृती व साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा भारतीय प्रतिमा शिक्षक पुरस्कार २०२५ कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी चे प्राध्यापक योगेश गंगाराम चव्हाण यांना प्राप्त झाला. पणजी येथे पार पडलेल्या या समारंभात गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर. माजी खासदार डॉ.सुनील गायकवाड आणि संजय मोहिते. अभिनेते कला दिग्दर्शक हेमंत कोळंबकर उद्योजक गोवा यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





