पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण च्या वतीने १ मार्च २०२५ रोजी भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी पंचशील विकास मंडळ खारेपाटण आयोजित व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण पुरस्कृत मर्यादित षटकांच्या भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दी.१ मार्च २०२५ ते दी.३ मार्च २०२५ या कालावधीत केदारेश्वर मैदान खारेपाटण येथे उकरण्यात आले असून या स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे.तरी ज्या संघाना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे दी.२७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आयोजकांकडे नोंदवावित असे आवाहन पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटणच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील अंतिम विजेता संघाला रोख रुपये २०,०००/- रकमेचे पारितोषिक व आकर्षक चषक तर उपविजेता संघाला रोख रुपये १०,०००/- रकमेचे पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.याबरोबरच या क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज,शेत्ररक्षक तसेच मालीकाविर व सामनावीर याना देखील आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा एक गाव एक संघ मर्यादित खेळविण्यात येणार असल्याची नोंद संघांनी घ्यावी.असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
तर या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या संघाना १५००/- रुपये एवढी प्रवेश फी ठेवण्यात आली असून ज्या संघाना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण चे कार्यकर्ते श्री संदीप पाटणकर -७२७६००५४२२ (गुगल पे नंबर ),मकरंद पाटणकर – ७२०८८१११४१,ललित पाटणकर –
७०५८८९८३७५,प्रियाल पोमेडकर-
९३२५१६३७७४ यांचेकडे दूरध्वनी द्वारे नोंदवावित असे आवाहन पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी केले आहे.





