सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला

स्थानिकांचा रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा निषेध

माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती

        सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग  याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे  चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद  या गुजराती कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. ०९/०१/२०२५ पासून या ९ सेतू सुविधा केंद्रांचे कामकाज सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी  यांनी कंपनीला  वर्कऑर्डर दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार गुजरातच्या उद्योजकांच्या फायद्यासाठीच  कार्यरत असून  सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला देऊन महायुती सरकारने  सिंधुदुर्गातील सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार व कर्मचारी यांचा रोजगार हिरावला आहे. सेतू सुविधा केंद्रांसाठी लावण्यात आलेल्या निकषांमध्ये  जिल्ह्यातील कंत्राटदार पात्र होणार नाहीत तसेच आपल्या मर्जीतील गुजराती कंपनीला टेंडर मिळेल अशाच पद्धतीने निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे महायुती  सरकार हे अदानी,अंबानी यांच्या नंतर अजून एका गुजराती कंपनीला टेंडर मिळवून देऊन स्थानिकांवर अन्याय करत आहे. अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली असून स्थानिकांचा  रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा त्यांनी निषेध केला आहे.
error: Content is protected !!