आचरा येथे शिवजयंती सोहळा सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा यांचे आयोजन

सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता वाहन फेरी, साडेनऊ वाजता शिवाजी महाराज मूर्ती पूजन, दहा वाजता सत्यनारायण महापूजा शालेय विद्यार्थ्यांचा गुणदर्शन कार्यक्रम साहसी खेळ ,सायंकाळी ४.३०वाजता हळदीकुंकू समारंभ, सात वाजता भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात मंडळातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!