नारींग्रे येथे 20फेब्रूवारी रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

नारिंग्रे येथील भावे यांच्या निवासस्थानी गुरुवार २०फेब्रुवारी रोजी १४७वा शेगाव निवासी गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५.३०पासून विजय ग्रंथ पारायण ,दुपारी १०.४५ ते १२.४५ महाराजांची महापूजा, अभिषेक , लघुरुद्र,महाआरती, दुपारी महाप्रसाद सायंकाळी तिर्थप्रसाद, सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज परीवार माणगाव सहभागाने दत्त नामस्मरण, रात्री साडेआठ वाजता टेवणादेवी प्रा भजन मंडळ तरंदळे बुवा भास्कर गावडे, पखवाज साथ संतोष गावडे यांचे सुश्राव्य भजन होणार आहे.
रात्रौ दहा वाजता श्री पावणादेवी प्रा भजन मंडळ दाभोळे वरचीवाडी बुवा सुधाकर घाडी पखवाज प्रथमेश घाडी यांचे सुश्राव्य भजन होणार आहे.
तरी भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन नारिंग्रे येथील भावे परिवाराकडून करण्यात आले आहे





