ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव सोहळा..!

चिंदर गावचा मानबिंदू असलेल्या किल्ले भगवंत गड येथे चिंदर सेवा संघाच्या वतीने चिंदर वासियांच्या सहकार्यांने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती सोहळा साजरा करण्याचे हे सहावे वर्ष आहे.
शिवजयंती सोहळ्यासाठी सरपंच नम्रता पालकर-महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, त्रिंबक हायस्कूल माजी मुख्याध्यापक सौ. हेमांगी खोत, चिंदर केंद्राचे माजी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, शिवप्रेमी, समस्त चिंदर वासियांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे.
यावेळी चिंदर गावातील विद्यार्थ्यांची शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग यावर कथाकथन स्पर्धा होणार आहे.





