चिंदर येथील श्री देव रामेश्वराचा आज वर्धापन दिन सोहळा

मालवण तालुक्यातील चिंदर येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वरचा १३ वा वर्धापन दिन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी साजरा होणार असून सकाळी ९ वा. शिव लघुरुद्र, सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी ६ ते ८ स्थानिक मंडळाची सुस्वर भजने, आरती, रात्रौ ९.३० वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण डबलबारी सामना बुवा संदीप पुजारे, पखवाज साथ संकेत राऊत, तबला साथ कौस्तुभ घाडी विरुद्ध बुवा संदिप लोके यांना पखवाज साथ योगेश सामंत तर तबला साथ संदेश सुतार करणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव रामेश्वर ट्रस्ट चिंदर यांनी केले आहे.