वायंगणी श्री देव रवळनाथ डाळपस्वारी १९ फेब्रुवारी पासून..

मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे ग्राम दैवत श्री देव रवळनाथ डाळपस्वारीला बुधवार १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. रविवार २३ फेब्रूवारी पर्यँत चालणारया डाळपस्वारीत पहिल्या दिवशी बुधवार १९ फेब्रुवारीला श्रींची स्वारी डाळपस्वारीला रवळनाथ मंदिर येथून दुपारी निघणार असून, श्री देव गांगेश्र्वर, श्री देव रामेश्वर भेट घेऊन देव मळा शेतीतून, श्री देव ठाणेश्वर, श्री राजेश्वर, विठलादेवी भेट घेऊन भंडारवाडी दर्शन, ग्रामस्थांना आशीर्वाद देऊन सायंकाळी श्री देव ठाणेश्वर मंदिर येथे विसवणार आहेत.
गुरुवार २० फेब्रुवारी रोजी श्रींची स्वारी दुपारी श्री ठाणेश्वर मंदिर मधून भटवाडी तेथे भाविकांना दर्शन आशिर्वचन देत श्री जामदार खाना येथे भेट व पाटवाडी येथून सायंकाळी श्री ब्राम्हणदेव बांध (तळेवाडी) येथे विसावणार आहेत.
शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी श्री ब्राम्हण देव बांध तळेवाडी येथून श्रींची स्वारी निघून तळेवाडी पश्चिम दर्शन, श्री देवी कुलस्वामिनी भेट, पूर्व तळेवाडी दर्शन, श्री भैरवनाथ भेट, नळेकरवाडी येथे भाविकांना दर्शन भेट देऊन, सायंकाळी श्री ब्राम्हणदेव मंदिर ( गडगेवाडी) येथे विसवणार आहेत.
शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी श्री ब्राम्हण देव, गडगेवाडी येथून डाळपस्वारी, गडगेवाडी, कालावल, खांबलवाडी व सडयेवाडी दर्शन होऊन सायंकाळी (सडयेवाडी) येथे विसवणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी सडयेवाडी येथून डाळपस्वारीला सुरुवात होऊन, श्री भिकन्नाथ भेट, कामत बाग दर्शन, श्री राजेश्वर भेट, मळेवाडी, दुखंडेवाडी, घाडीवाडी, श्री गांगेश्र्वर, रामेश्वर भेट, देऊळवाडी दर्शन होऊन श्री सातेरी देवी भेट, घेऊन सायंकाळी श्री रवळनाथ मंदिर ( मांड ) येथे देव येत डाळपस्वारी पूर्ण होणार आहे.
भाविकांनी, डाळपस्वारीत सहभागी होण्याचे आवाहन श्री रवळनाथ गाव-हाटी देवालय समिती वायंगणी, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!