कणकवली वागदेत अपघात एक जण गंभीर जखमी

महामार्गावर उभा देव नजिक घडला अपघात

दोन्ही कारचे मोठे नुकसान

कणकवली वागदे येथे दोन कार मध्ये झालेल्या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. पंढरपूर वरून मालवणच्या दिशेने जाणारी टाटा अल्ट्राज व मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार यांच्यामध्ये नियंत्रण सुटून हा अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर वागदे उभादेव नजीक घडला. अपघातात अल्ट्रास कार मधील वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवा शिवगण यांच्यासह महामार्ग व वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर महामार्गावर गाडीच्या काचा व साहित्य रस्त्यावर विखुरले होते.

error: Content is protected !!