कणकवली पेन्शनर्स असोसिएशन चा संपास पाठिंबा

कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा शासकीय कर्मचारी/ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी संपाला पूर्ण पाठिंबा- कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सन्मा.श्री सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 15 /3 /2023 रोजी सकाळी 10:30 वाजता कलमठ येथील पेन्शनर भवन मध्ये पार पडली.
सदर सभेला सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यकश आंबेकर साहेब उपस्थित होते. त्यांचा सभागृहात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तपेन्शन बाबत सभेत चर्चा करताना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब यांनी निकाल दिल्याप्रमाणे पेन्शन ही पेन्शनरांना भीक नसून त्यांचा मौलिक अधिकार आहे. 14/03/2023 पासून ला विविध संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाबाबत जिल्हाध्यक्ष आंबेकर यांच्या समवेत चर्चेत सभेत सर्वानुमते ठरल्यानुसार सदर राज्यव्यापी बेमुदत संपास कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी जाहीर केले .सदर सभेस उपाध्यक्ष मनोहर पालयेकर ,सचिव व्ही.के. चव्हाण, सहसचिव जी .एल. सावंत सन्मा. कार्यकारिणी सदस्य श सुरेश पाटकर , भास्कर वंजारे ,अशोक राणे ,सखाराम सपकाळ , श्री परशुराम साधले, सिद्धार्थ तांबे ,नवीन सभासद श्रीमती सुगंधा देवरुखकर, श्र हरी चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!