“रोटरी आनंदमेळा २०२३” मध्ये रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तर्फे आज पासून विशेष कार्यक्रमांच आयोजन.
आज महिलांसाठी “मला पैठणी जिंकायचीय” स्पर्धा.
कणकवली : १० मार्चपासून सुरू असलेल्या रोटरी आनंद मेळा २०२३ मध्ये दररोज विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येत आहे.रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तर्फे आज पासून या रोटरी आनंद मेळ्यामध्ये विशेष कार्यक्रमांच आयोजन दिनांक 22 मार्च रोजी पर्यंत करण्यात आलेल आहे. आज दिनांक 17 मार्च रोजी “मला पैठणी जिंकायची” आहे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी “फॅशन शो” चे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी “डॉग,पपी,कॅट” शो तसेच रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी “रेकॉर्ड डान्स स्पर्धा” रविवार दिनांक 19 मार्च रोजी “वेशभूषा स्पर्धा”, सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी “मतिमंद मुलांचे संस्कृती कार्यक्रम” तसेच 20 मार्च 2023 रोजी “मेरी आवाज सुनो” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल आहे.तसेच 21 मार्च 2023 रोजी “स्टँड अप कॉमेडी स्पर्धा” आणि हास्य सम्राट प्रा अजित कुंभार कोष्टी यांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल आहे.रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांच्या वतीने आयोजित “रोटरी आनंद मेळा 2023” च्या शेवटच्या दिवश दिवशी कणकवली वासियांच्या मनोरंजनासाठी आकर्षण म्हणून “विशेष ऑर्केस्ट्राचं”आयोजन करण्यात आलेल आहे. रोटरी आनंद मेळा 2023 मध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच गृहपयोगी वस्तूंची विक्री तसेच विविध पक्षी,प्राणी यांचे प्रदर्शन आणि “एंटरटेनमेंट शोचं” आयोजन देखील करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण “रोटरी आनंद मेळा 2023” ला कणकवली वासियांची दिवसेंदिवस गर्दी वाढताना बघायला मिळत असून या आनंदमेळ्यामुळे शहरात आनंदी वातावरण आहे.