यश कॉम्प्युटर खारेपाटणचे संचालक मंगेश गुरव यांच्या सौजन्याने खारेपाटण हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यश कॉम्प्युटर खारेपाटणच्या वतीने खारेपाटण शेठ न म विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी सदर मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन सिताई रिसॉर्ट चे मालक श्री ओंकार गुरव यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री महेश कोलसुलकर, संचालक श्री गुरु शिंदे, श्री विजय देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मंगेश ब्रह्मदंडे, खारेपाटण तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुहास राऊत, लांजा सिरीयल कॉलेजचे उपप्राचार्य श्री चव्हाण सर, खारेपाटण सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ए डी कांबळे सर, खारेपाटन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सानप सर, पर्यवेक्षक श्री राऊत सर सर्व शिक्षक. तसेच मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित असणारे फोंडा हायस्कूलचे गणित विषयाचे शिक्षक श्री राठोड सर, रावराणे हायस्कूल वैभववाडी चे श्री शिंदे सर, नरडवे हायस्कूलच्या शिक्षिका परब मॅडम ,विद्यामंदिर कणकवली चे शिक्षक श्री ठाकूर सर उपस्थित होते.
-
- यावेळी खारेपाटण सीनियर कॉलेज ने NAC नामांकनात बी ग्रेड प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर ए डी कांबळे सर यांचा सत्कार यश कम्प्युटर अकॅडमी चे संचालक श्री मंगेश गुरव यांनी केला.
- त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. सदर मार्गदर्शन शिबिराचा आपल्याला खूप चांगला लाभ झाला. याचा फायदा नक्कीच येणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षेत आम्हाला होईल अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
या करीता शेठ न म विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सानप सर तसेच पर्यवेक्षक श्री राऊत सर यांनी विशेष सहकार्य केले.
या शिबिरात ई 10 वी विद्यार्थांना गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दी. 18 रोजी *10 वी 12 वी नंतर पुढे काय? करियर संधी, तसेच बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले, या करीता शेरपे मुख्याध्यापक श्री अत्तार सर व जिनियास अकॅडमी रत्नागिरी चे डॉ अजित पालकर सर उपस्थित होते.
या शिबिरात सुमारे 150 विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शनाचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री सानप सर व पर्यवेक्षक श्री राऊत सर यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री मोठे सर यांनी केले. व सर्व मान्यवरांचे व मार्गदर्शक विद्यार्थ्याचे आभार आयोजक श्री मंगेश गुरव यांनी मांनले.





