लोरे गावाला पर्यटन व विकासात पुढे आणण्याची जबाबदारी आता माझी!

लोरे गावातील मुंबईस्थित मतदारांच्या स्नेह व कृतज्ञता मेळाव्यात मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता हा मेळावा

कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातून महाविजयी हॅट्रिक साजरी करण्यात लोरे नं 1 गावातील मुंबईस्थित मतदारांचेही मोठे योगदान आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला सलग तिसऱ्यांदा आमदार बनवलात. तुमच्या मतांच्या आशीर्वादाने आज मी मंत्री झालो आहे. आजच्या या स्नेहसंमेलन आणि कृतज्ञता मेळाव्यास माझ्या शुभेच्छा आहेत. मला मतदान करून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले आहे. आता लोरे नं 1 गावाला पर्यटन दृष्ट्या पुढे आणणे आणि गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. विकासकामे आणि विकासनिधी मध्ये लोरे नं 1 गावाला नेहमीच झुकते माप देईन अशी ग्वाही मत्सोद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख मनोज तुळशीदास रावराणे यांच्या संकल्पनेतून लोरे नं. १ गावातील मुंबईस्थित मतदारांच्या स्नेह संमेलन आणि कृतज्ञता मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मंत्री नितेश राणे बोलत होते. दादर मुंबई येथे रविवार 5 जानेवारी रोजी कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 गावातील मुंबईस्थित मतदारांचे स्नेहसंमेलन आणि कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला लोरे नं 1 गावच्या मतदार असलेले मुंबईस्थित शेकडो चाकरमानी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजक मनोज रावराणे यांनी बोलताना सांगितले की लोकसभा, विधानसभा तसेच स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत लोरे नं 1 गावचे मतदार असलेले मुंबईस्थित सर्व चाकरमानी आवर्जून गावी येऊन मतदान करतात. विधानसभा निवडणुकीतही मुंबईस्थित चाकरमानी मतदारांनी गावी येऊन एकगठ्ठा मतदान मंत्री नितेश राणेंना केले. मतदानानंतर आपापल्या रोजीरोटीसाठी चाकरमानी मतदार पुन्हा मुंबईला जातात.
विजयोत्सव किंवा आनंदोत्सव साजरा करताना त्यांना सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुंबई मध्ये आवर्जून हा कृतज्ञता मेळावा आणि स्नेहसमलेंनाचा कार्यक्रम आयोजित केला. यानिमित्ताने गावात होत असलेली विकासकामे आणि अपेक्षित विकास कामे, संकल्पना यांची देवाणघेवाण होईल. लोरे नं 1 गावचे सरपंच अजय रावराणे यांनी
कामाची माहिती दिली. तसच पुढील काळात आपल्या स्वप्नाताल गाव सर्वांगसुंदर कसे होईल, संपुर्ण महाराष्ट्रात गावाचावं नावलौकीक होईल यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमी प्रयत्नशील असू. आमच्या प्रयत्नात आपल्या सर्वांचा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुंबईस्थित चाकरमानी जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सुमन गुरव, ग्रामपंचायत सदस्य नरेश गुरव, अनंत रावराणे, अलंकार रावराणे, सुनील रावराणे, दीपक रावराणे, सागर रावराणे, एकनाथ गुरव, बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते यांच्यासह लोरे नं 1 गावचे मतदार असलेले मुंबईस्थित शेकडो चाकरमानी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजक मनोज रावराणे यांनी बोलताना सांगितले की लोकसभा, विधानसभा तसेच स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत लोरे नं 1 गावचे मतदार असलेले मुंबईस्थित सर्व चाकरमानी आवर्जून गावी येऊन मतदान करतात. विधानसभा निवडणुकीतही मुंबईस्थित चाकरमानी मतदारांनी गावी येऊन एकगठ्ठा मतदान मंत्री नितेश राणेंना केले. मतदानानंतर आपापल्या रोजीरोटीसाठी चाकरमानी मतदार पुन्हा मुंबईला जातात. विजयोत्सव किंवा आनंदोत्सव साजरा करताना त्यांना सहभागी होता येत नाही. त्यामुळे मुंबई मध्ये आवर्जून हा कृतज्ञता मेळावा आणि स्नेहसमलेंनाचा कार्यक्रम आयोजित केला. यानिमित्ताने गावात होत असलेली विकासकामे आणि अपेक्षित विकास कामे, संकल्पना यांची देवाणघेवाण होईल. लोरे नं 1 गावचे सरपंच अजय रावराणे यांनी मनोगत व्यक्त करताना गावात केलेल्या विकास कामाची माहिती दिली. तसेच पुढील काळात आपल्या स्वप्नातील गाव सर्वांगसुंदर कसे होईल, संपुर्ण महाराष्ट्रात गावाचावं नावलौकीक होईल यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमी प्रयत्नशील असू. आमच्या प्रयत्नात आपल्या सर्वांचा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मुंबईस्थित चाकरमानी जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी
केलेल्या व्यक्तींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!