कणकवली तालुकास्तरीय शालेय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा नडगिवे येथे शुभारंभ…

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणा बरोबरच खेळ ही महत्वाचा… — अरुण चव्हाण,गट विकास अधिकारी कणकवली

खेळ व शिक्षण या नाण्याच्या दोन बाजू असून खेळाशिवाय शिक्षण हे अपूर्णच आहे.आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात अधिक जलद, अधिक उंच अधिक बलवान आणि अधिक बुद्धिमान होण्यासाठी शिक्षणा बरोबरच खेळ ही महत्वाचा आहे.असे भावपूर्ण उदगार कणकवली पं.स.गटविकास अधिकारी श्री अरुण चव्हाण यांनी नडगिवे ता.कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवेच्या भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या जि.प.प्राथमिक शाळांच्या शालेय विद्यार्थी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रमाला नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष श्री मनोज गुळेकर,सिंधुदुर्ग जि.प.माजी वित्त व बांधकाम सभापती श्री.रवींद्र उर्फ बाळा जठार,माजी जि.प.सदस्य प्रकाश पारकर,कणकवली पं.स.सहाय्यक गट विकासअधिकारी श्री वलावकर, नडगिवे गावच्या सरपंच सौ माधवी मण्यार,उपसरपंच भूषण कांबळे, वारगाव उपसरपंच श्री नाना शेट्ये, युवा उद्योजक प्रनील शेट्ये,तेजस जमदाडे,गट शिक्षण अधिकारी श्री किशोर गवस,शिक्षण विस्तार अधिकारी श्री कैलास राऊत,नॅशनल इंग्लिश मिडीयम चे कार्याध्यक्ष श्री रघुवीर राणे संचालक श्री राजेंद्र ब्रम्हदंडे,मोहन कावळे, परवेज पटेल, मुख्यद्यापिका श्रीम.नीलम डांगे,राजापूर अर्बन बँकेच्या तळेरे शाखेचे मॅनेजर श्री दुर्गेश बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री संतोष पाटणकर,श्री मंगेश गुरव, माजी तळेरे प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे,क्रीडा प्रमुख कैलास राऊत,सत्यवान केसरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घघाटन माजी वित्त व बांधकाम सभापती श्री रवींद्र जठार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.तर भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला नॅशनल इंगीलश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष श्री मनोज गुळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी नडगिवे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हणून पाहुण्यांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले.तर उपस्थित मान्यवरांचे गट शिक्षण अधिकारी किशोर गवस यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तर किडा स्पर्धेची ज्योत नॅशनल इंग्लिश मिडीयम संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रघुवीर राणे यांचे शुभहस्ते प्रज्वलित करण्यात आली. यावेळी क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षक याना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी बोलताना रवींद्र जठार म्हणाले कणकवली तालुका नेहमी यश मिळविणारा तालुका राहिलेला असून जिल्ह्यात देखील शालेय क्रीडा स्पर्धेत आपल्याच तालुक्याचे वर्चस्व राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना केले. तर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष श्री मनोज गुळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले विद्यार्थी हा माझ्यासाठी केंद्र बिंदू असतो त्याचे शिक्षणाचे माध्यम कोणते आहे हे महत्वाचे नाही.मात्र मी एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेचा जरी अध्यक्ष असलो तरी मराठी ही आपली मूळ मातृभाषा असून ती सुद्धा टिकली पाहिजे.त्यासाठी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची संधी मला दिलीत त्यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो.व मराठी शाळांच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात माजी पं.स. सभापती प्रकाश पारकर,नडगिवे सरपंच सौ माधवी मण्यार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोर गवस यांनी केले.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश कदम सर यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार खारेपाटण केंद्रप्रमुख श्री संजय मपवार यांनी मानले.या क्रीडा स्पर्धेला कणकवली तालुक्यातील सर्व मुख्याद्यापक,केंद्रप्रमुख,क्रीडा प्रमुख व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी व शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!