खारेपाटण येथे रस्ता संरक्षक भिंत व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ….

मुंबई – गोवा महामर्गवरून थेट खारेपाटण बाजारपेठेत आलेल्या मुख्य रस्त्याचा खारेपाटण हायस्कूल जवळील वळणातील रस्त्याला २४ मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधणे व ४०० मीटर रस्ता डांबरीकरण करणे मोरी बांधणे कामाचा शुभारंभ बुधवारी खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
याप्रसंगी खारेपाटण माजी सरपंच श्री रामकांत राऊत,विद्यमान उपसरपंच श्री महेंद्र गुरव,भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्री सुधीर कुबल,ग्रा.पं. सदस्य सुधाकर ढेकणे,जयदीप देसाई,किरण कर्ले,सौ.मनाली होनाळे,अमिषा गुरव,शीतीजा धुमाळे,धनश्री ढेकणे,दक्षता सुतार,भाजप कार्यकर्ते श्री राजेंद्र वरुणकर,प्रकाश कांबळे, नंदू कोरगावकर,गणेश कारेकर, खारेपाटण हायस्कूलचे प्राचार्य संजय सानप,श्री यशवंत
रायाबागकर आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुमारे २४ लाख रुपये मंजूर असलेले हे रिटनिंग वॉल व मोरी बांधकाम व रस्ता डांबरीकरणाचे काम अर्थसंकल्प (बजेट )२०२२ – २३ मधून मंजूर करण्यात आले
असून या कामा करीता माजी पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण व माजी आमदार तथा सद्याचे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मस्त्योउद्योग मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून व खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांच्या प्रयत्नातून सदरहू काम मंजूर करण्यात आले असून खारेपाटण हायस्कूल वळणातील बरेच दिवस ग्रामस्थांची मागणी होत असलेले हे काम मंजूर झाल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.